
पुणे : रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. महासंघाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आयुक्तांनी चर्मकार समाजाशी संबंधित प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत ठोस आश्वासने दिली.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींची बैठक आयुक्तांशी झाली. बैठकीत आयुक्तांनी मुंढवा येथे चर्मकार समाजासाठी राखीव भूखंडावर घरकुल प्रकल्प उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच संत रोहिदास महाराजांचा पुतळा जुनी जिल्हा परिषद चौकात फेब्रुवारीपर्यंत उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कष्टकरी चर्मकार गठाई कामगारांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी स्टॉल मंजुरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड, विजय वरछाये, सुनील गायकवाड, सारिकाताई कांबळे, सुनील राठी, सुनील चराटे, अशोक ठवार, प्रभू उदपुरे, रवींद्र शिराळे, रमेश वाहाळ, लखन बेदरकर, बंडू पुरुषोत्तम, उमेश चराटे, रोहिदास थोरात, सिंधुताई शिरे, गौरी बशिरे, शालिकराम सरसरे, सुदर्शन बनसोडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासंघाच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने दिलेली आश्वासने चर्मकार समाजासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
Editer sunil thorat




