जिल्हाशिक्षणसामाजिक

जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा…

पुणे : जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे येथे ३० जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी दोन मिनिटे शांतता पाळून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास जे.एस.पी.एम. शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडेडॉ. मारुती काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी हे शांतता व अहिंसेचे प्रणेते म्हणून जगभर ओळखले जातात. त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, खिलाफत चळवळ, भारत छोडो चळवळ तसेच चंपारण्य सत्याग्रह यांसारख्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या चळवळींमध्ये नेतृत्व व मोलाचे योगदान दिले. गांधीजींच्या विचारांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अतुलनीय कार्यावर प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तरुण पिढीने स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाची जाणीव ठेवून अहिंसेचा मार्ग अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशीद, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसेआकांक्षा जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमातून गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??