जिल्हासामाजिक

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आरती सकटची मुंबई पोलीस दलात निवड; १५० पैकी १२४ गुण मिळवत घवघवीत यश…

मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आरती सकट हिचे पेढा भरवून अभिनंदन करताना तिचे आई-वडील.

लोणी काळभोर, ता. ३१ : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या बळावर हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कु. आरती रविंद्र सकट हिने मुंबई पोलीस दलात निवड मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत १५० पैकी तब्बल १२४ गुण मिळवत तिने नेत्रदीपक कामगिरी केली असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या आरतीने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. तिचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर लहान भाऊ टायरच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावतो. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबाने आरतीच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही.
आरतीने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका रुग्णालयात स्वागतकक्षावर नोकरी करत कुटुंबाला आधार दिला. २०२३ पासून ती पोलीस भरतीची तयारी करत होती. वनविभागाच्या जागेतील पत्र्याच्या साध्या घरात राहूनही तिने आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आणि संघर्षाची वाट निवडली.

विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या अकॅडमीचे मार्गदर्शन न घेता, केवळ मैदानावरील सरावासाठी मोहम्मद शेख यांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर आरतीने हे यश मिळवले. रुग्णालयातील कामादरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेचा अभ्यासासाठी उपयोग करत तिने स्वतःच्या ज्ञान, आत्मविश्वास आणि कष्टांच्या जोरावर पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले.

आरतीच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या जिद्दीचे, संघर्षाचे आणि आई-वडिलांच्या कष्टाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

“हे यश अंतिम नाही; पोलीस निरीक्षक होण्याचे स्वप्न”

यशाबद्दल बोलताना आरती सकट म्हणाली, “देशसेवेची भावना आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. या यशामागे आई-वडील आणि भावाचा विश्वास व पाठिंबा हेच माझे खरे बळ ठरले. मात्र हेच अंतिम ध्येय नसून, पुढील स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदावर पोहोचण्याचा माझा निर्धार आहे.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??