आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा १९४ वा स्मृतिदिन लोणी काळभोर येथे श्रद्धा व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा…

लोणी काळभोर (ता. हवेली) : (दिनांक ०३) फेब्रुवारी २०२६ रोजी आद्यक्रांतिवीर, स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा १९४ वा स्मृतिदिन लोणी काळभोर येथे अत्यंत श्रद्धा, सन्मान व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी लोणी काळभोर येथे राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हार घालून विधिवत पूजन करण्यात आले.
या पूजनाचा मान लोकप्रिय आमदार माऊली कटके यांना लाभला. यावेळी त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करत, अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या या थोर क्रांतिकारकाचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली संचालक प्रशांत काळभोर, लोणी काळभोर गावचे सरपंच नागेश काळभोर यांच्यासह अण्णासाहेब गणपत काळभोर, माऊली काळभोर, प्रताप बोरकर, सुभाषराव काळभोर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिवसेना नेते रमेश भोसले, मिलिंद काळभोर, युवराज काळभोर, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष भोसले, कळंबा केसरी मनोज काळभोर, सतीश गुंडा काळभोर, सतीश सिद्धाप्पा बाळ, शंकर संतोष जानवेकर यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उपस्थितांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार शितल सुजित कांबळे तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार रेश्मा काळभोर यांना जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला. आगामी निवडणुकीत विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात अनिताताई गोरे, कौशल्यताई जगत, अॅड. अनिताताई गवळी, अंजनाताई देडे, अश्विनीताई काळभोर यांचाही सक्रिय सहभाग होता.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे रिपब्लिकन भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र जैनजांगडे यांनी दिलेला जाहीर पाठिंबा. त्यांनी लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांना “जग बदलणार बाप माणूस” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तक भेट स्वरूपात प्रदान केले. यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा समाज परिवर्तनासाठी कसा उपयोग होतो, याबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या बलिदानाची आठवण करून देत, त्यांच्या शौर्य, स्वाभिमान व अन्यायाविरोधातील संघर्षाची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, असे आवाहन केले.
सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनाचा विचार या कार्यक्रमातून ठळकपणे मांडण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. स्मृतिदिनाच्या निमित्ताने लोणी काळभोर परिसरात इतिहासाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
Editer sunil thorat





