जिल्हाशिक्षणसामाजिक

महात्मा फुले सांस्कृतिक भवनात बालकलांचा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न…

मांजरी (बु.) (हडपसर) : येथील माथमा फुले सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेला बालकलांचा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे पालकांसह उपस्थित मान्यवरांमध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत येऊ लागली. Playgroup, Nursery, LKG आणि UKG या वर्गांतील विद्यार्थ्यांनी एकूण १६ विविध गाणी, नृत्यप्रकार व नाट्यछटा (Acts) सादर करत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. लहानग्यांच्या निरागस नृत्य, अभिनय व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक हेमंत विजय टोलीवाल, सह-संस्थापक राधिका हेमंत टोलीवाल, शाळा समिती सदस्य गिरीश विजय टोलीवालप्रियांका गिरीश टोलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवर म्हणून माधव पांडुरंग राऊत (डायरेक्टर – Venus World School, Shreenath Mhaskoba Sakhar Karkhana Ltd., Sri Sri Milk Food Products – Amul Co-Packing Division), डॉ. महादेव कोद्रे (नगरसेवक, प्रभाग क्र. १५), वंदनाताई कोद्रे, डॉ. किरण प्रकाश चव्हाण (मानसोपचार तज्ज्ञ, संचालक – Sanwaad Rehabilitation Centre व Mano Brahma Foundation), शिवराज अप्पा घुले (सरपंच, मांजरी बु.), तुषार घुले (समाजसेवक, भाजपा), विक्की माने (शासन नियुक्त नगरसेवक) व राजश्री विक्की माने, समीर घुले (माजी उपसरपंच), नंदाताई अबनावे (नगरसेवक) व अनिल अबनावे, अॅड. चंद्रशेखर घाटे यांची उपस्थिती लाभली. तसेच Saturday Club चे सदस्य व Chapter Chair Person यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग Gloria, Shraddha, Dipika, Swapnapriti, Renuka, Ashwini K, Nikita, Nidhi, Pooja S, Priyanka, Snehal, Pooja B, Ashwini, Komal, Shubhangi तसेच सर्व मावशींनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला.

हा कार्यक्रम बालकलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा असून पालकांसाठी अभिमानाचा क्षण ठरल्याची प्रतिक्रिया अनेक उपस्थितांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??