सामाजिक

‘गौरव संविधानाचा’ कार्यक्रमातून उलगडला महामानवाचा संघर्षमय प्रवास ; विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव…

पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) तर्फे जागर संविधानाचा या उपक्रमाअंतर्गत आज ‘गौरव संविधानाचा’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला ‘गौरव संविधानाचा’ मधून उजाळा देण्यात आला.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडीमध्ये दिमाखदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सुमधूर व दर्जेदार गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

उदय साटम निर्मित – दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा’ या गीताने करण्यात आली, त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यावरील ‘दोनच राजे इथे ….’ , महात्मा फुले यांच्या वरील ‘धन्य धन्य ते महात्मा फूले’, ‘बुद्ध -कबीर – भीमराव – फुले’ यासह डॉ. आंबेडकर यांचा संघर्षमय जीवणप्रवास विविध गीते आणि संगीत नाटिका मधून उलगाडण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन प्रतिक जाधव यांनी केले होते तर गायक दर्शन साटम, गायिका उमा गावड, स्वाती हरवंदे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले तर संगीत संयोजन शरद वाणी, अभिजीत मोरे यांनी केले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते शैलेन्द्र चव्हाण, सांसकर्तीक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??