क्राईम न्युज

“विधिसंघर्षित बालकांकडून ३ गुन्हे उघड. किं. रू ३,८५,०००/- चा माल जप्त. हडपसर पोलीसांची कारवाई “…

संपादक सुनिल थोरात

पुणे: हडपसर पोलीस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये घरफोडी होणारे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहीती संकलीत केली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवण्यात आली.

हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून केलेल्या सीसीटीव्ही विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे प्रभारी अधिकारी हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक, सत्यवान गेंड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अविनाश गोसावी, अमित साखरे, अमोल दणके, महेश चव्हाण, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, सागर कुंभार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना ३ विधीसंषर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासात, त्यांनी मागील २ महिन्याचे कालावधीमध्ये वेळोवेळी घरफोडी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडून आज रोजी पर्यंत खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ४६०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४)

२) हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र. नं ३४९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०६, ३(५)

३) जेजुरी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ३२३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२)

एकूण ०३ गुन्हे उघडकीस आले असून ३४.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किं. रू २,७५,०००/-तसेच २ लॅपटॉप किं. रु ६०,०००/- आणि गुन्हा करताना वापर केलेली ५०,०००/- किं.रू ची होंडा शाईन मोटारसयकल असा किं. रू ३,८५,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??