सामाजिक

सन्मान विधवा महिलांचा ; कार्यक्रम हळदी कुंकवा पलिकडचा..

पुणे : नवविवाहित महिलांच्या पुढाकाराने विधवा महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम नेहा कांबळे व मोनिष कांबळे या दाम्पत्याने आयोजित केला होता.

नेहा कांबळे यांनी भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम कासेवडीत बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लोकायतच्या समन्वयक ॲड. मोनाली अपर्णा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत याची प्रथम सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाने अधोरेखित केली, त्याचबरोबर त्यांनी भारतीय संविधानामध्ये असलेलली मूल्ये अगदी सोप्या भाषेत सांगितली. विधवा महिलांना हळदी कुंकू लावत व सौभाग्याचे वाण म्हणून एक प्लेट व संविधानाची प्रास्ताविका देण्यात आली.

त्याचबरोबर संविधानाची शपथ घेण्यात आली. अध्यक्षा म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सचिव अ‍ॅड. शारदाताई वाडेकर यांनी विधवा महिलांना स्त्रीच्या पलीकडे जाऊन तिचं माणूसपण मान्य करत तिचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी आम्ही विधवा महिलांना अशी वागणूक देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत हळदी कुंकू लावून अनेक विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मुलीचे लग्न लवकर न लावता त्यांना शिकू द्या आणि मुलगा मुलगी याच्यामध्ये भेद करू नका, मुलाला तूपरोटी आणि मुलीला चटणी भाकर असं करू नका, महिलांच्या ज्या काही अडचणी असल्यास त्यांनी त्या न घाबरता सांगणे व कुठल्याही अन्याय चर्चा न करणे असा मूलमंत्रही दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिष कांबळे यांनी केले. तर मयूर वायफळकर, गणेश मेरगू, ओंकार मोरे, आकाश पवार, विजय जगताप, अक्षय दोनगहू, योगेश मंजुळा, करण कांबळे यांचे अनमोल सकार्य लाभले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??