जिल्हा

पीएमआरडीए ची अनधिकृत होर्डिंग वर कारवाई… कदमवाकवस्ती…

संपादक सुनिल थोरात

पुणे (हवेली) : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत होर्डिंग वर पीएमआरडीएने कारवाई करण्यात सुरुवात केली असून पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती येथील दत्तमंदिर व एमआयटी कॉर्नर येथील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएच्या अनिक्रमण विभागाने मंगळवार (२७ मे) रोजी दुपारी बारा वाजण्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु ही कारवाई हवेलीत थेऊ फाटा ते दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड व पाटस या ठिकाणी असलेल्या अनेक अधिक अनधिकृत होर्डिंगवर होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

पीएमआरडीएने अनधिकृत होर्डिंग पाडण्यासाठी दोन पथके तयार केली आहे. या पथकाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या अनधिकृत होर्डिंग जमिनदोस्त करण्याचे काम भर पावसात सुरु केले आहे. यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी, पदाधिकारी, व लोणी काळभोर पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते पाटस टोलनाका या दरम्यान असलेल्या पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असुन या दरम्यान, १५९ हून अधिक अनधिकृत होर्डिंग आहेत. यांतील केवळ ५ ते ६ अधिकृत होर्डिंग आहेत. हे वगळता सर्व बेकायदा होर्डिंग संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या पुर्वी काढण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएकडून मिळत आहे.

सदर अनधिकृत होर्डिंग पडण्याचे काम एका कंपनीला दिले असून ही कंपनी अनधिकृत होर्डिंग पाडत आहे. होर्डिंग पडल्यानंतर सर्व लोखंड व साहित्य गोळा करून घेतले जात आहे. यांच्या विक्रीतुध येणाऱ्या रकमेतील ३५ टक्के रक्कम प्रशासनाकडे जमा करीत आहेत. यामुळे कोणताही पैसा खर्च न करता यामध्ये सुद्धा प्रशासनाचा आर्थिक फायदा होत आहे.

पुर्व हवेलीतील थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी व उरुळी कांचन येथील एलाईट चौक, तळवडी चौक या समवेत दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड व पाटस या ठिकाणी अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. हे सर्व होर्डिंग लोकवस्तीत असून जागा मालक व चालकाने धोकादायकरीत्या उभारले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र हे जागामालक राजकीय क्षेत्रातील असून त्यांचे मोठ्या राजकीय पक्ष्यांच्या नेत्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्याच्याही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार का? खरंच ‘या’ अनधिकृत होर्डिंगवर निघणार का? असा यक्षप्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??