पुणे (हडपसर) : विद्यार्थ्यांचे भूगोल विषयाचे ज्ञान वाढावे, पर्यावरण निसर्ग संवर्धनाची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या भूगोल व बी व्होक. (पर्यटन आणि सेवा उद्योग) विभागाच्या वतीने दि. ९ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत वसुंधरा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते श्री बिपिन सुर्वे, संगीतकार अवधूत गांधी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते तसेच उपप्राचार्य डॉक्टर शुभांगी औटी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ. सविता कुलकर्णी, भूगोल विभागातील डॉ. गणेश गांधीले, प्रा. शितल गायकवाड, प्रा. रेवती नेवासकर प्रा. अविनाश राठोड प्रा. नाजनीन मनेर, प्रा. ज्योती धोत्रे, प्रा. नवनाथ गाढवे व विद्यार्थी उपस्थित होते. सप्ताहाचे उद्घाटन रांगोळी स्पर्धेने झाली. फीत कापून सप्ताहाचे व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सविता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना वसुंधरा सप्ताहाची माहिती दिली व यामध्ये पीपीटी, सामान्य ज्ञान, नकाशा भरणे, पाककला, रांगोळी, प्रोजेक्ट, फोटोग्राफी अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी असे उपक्रम महत्त्वाचे असून यामुळे विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री अवधूत गांधी यांनी रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांचे कौतुक केले. रांगोळी हे व्यक्त होण्याचे, संदेश देण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश गांधीले यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर शुभांगी औटी यांनी केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन भूगोल विभाग प्रमुख डॉ. सविता कुलकर्णी डॉ. गणेश गांधिले, प्रा. शितल गायकवाड, प्रा. रेवती नेवासकर, प्रा. अविनाश राठोड, प्रा. नाजनीन मणेर, प्रा. ज्योती धोत्रे,प्रा. नवनाथ गाढवे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा