सामाजिक

PMPML BUS वाहन चालकांनो सावधान ! मोबाईल, तंबाखू , व्यसन केल्यास होणार कडक कारवाई..! तक्रारीकरीता संपर्क जारी ; वाचा संपूर्ण माहिती..

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या एका चालकाला बस चालवताना आयपीएल सामना पाहिल्यामुळे निलंबित करण्यात आले.

या घटनेनंतर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने सर्व कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कामकाजा वेळेत कोणत्याही प्रकारचे व्यसन, असंवेदनशील किंवा निष्काळजीपणाचे वर्तणूक केल्यास संबंधित चालकावर (PMPML) विभागा मार्फत कडक कारवाईचे नियम लागू केले आहेत.

पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना कडक सुचना जारी केल्या असून चालकांना आणि वाहकांना गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, तसेच तंबाखू-पान मसाला यांचे सेवन करणे, अशा कारणांसाठी निलंबित केले जाऊ शकते. पीएमपीएमएलने आपल्या कर्मचाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

यापूर्वीही, पीएमपीएमएलने त्यांच्या चालकांना आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरण्यास, हेडफोन घालण्यास किंवा तंबाखू आणि पान मसाला खाण्यास मनाई करण्याचे कडक निर्देश जारी केले होते. या नियमांचे उल्लंघन केल्यास दोन महिन्यांचे निलंबन केले जाईल असे परिपत्रकात म्हटले होते.

सध्या पीएमपीएमएलकडे ९४०० चालक कर्मचारी आहेत, ज्यात ४४०० कंत्राटी चालकांचा समावेश आहे. आता पीएमपीएमएलने चालक किंवा वाहकांविषयीच्या तक्रारींसाठी व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी तक्रारींचे फोटो/व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ पीएमपीएमएलच्या ईमेल complaints@pmpml.org, व्हॉट्सअॅप क्रमांक 9881495589 वर पाठवण्याची विनंती केली आहे किंवा पीएमपीएमएलच्या जवळच्या डेपोमध्येही पुराव्यासह तक्रारी सादर केल्या जाऊ शकतात.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??