जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट…

प्रतिनिधी डॉ गजानन टिंगरे
पुणे : परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला विहीत वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले.
अनाधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी बस थांबवणाऱ्या चालक- वाहकांवर कारवाई…





