जिल्हासामाजिक

फ्लॅट मध्ये, जवळपास ३०० मांजरी पाळल्या, हडपसर मधील घटना, रहिवासी यांची तक्रार दाखल…

पुणे (हडपसर) : एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका महिलेने फ्लॅट मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ३०० हून अधिक मांजर पाळले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील ३ बीएचके फ्लॅटमध्ये या मांजरांसह एक महिला राहतेय. त्यामुळेच हा विषय चर्चेचा विषय ठारत असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय म्हणाले रहिवासी?

“मी गेली १० वर्ष झालं इथे सोसायटी मध्ये राहत आहे. मांजर पाळण्याबाबत काही नसून त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये असं वर्तन असलं पाहिजे. यामुळे येणारा उग्र वास आणि ड्रेनेज मध्ये जाणारं पाणी यामुळे सोसायटीमधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या मांजराचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो. यामुळे ही आम्हाला खूप त्रास होत आहे, असं एका रहिवाशानं सांगितलं.

जेवण तयार करताना असो की इतर वेळेस जेव्हा दरवाजा, खिडकी उघडतो तेव्हा प्रचंड घाण वास येतो. २०२० मध्ये आम्हाला समजलं की ९ नंबर फ्लॅट मध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडे मांजर आहेत. परंतु तेव्हा त्यांच्याकडे ५० मांजरी असल्याचं समजलं तेव्हा भीती वाटत होती. आम्ही पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडे या प्रश्नासबंधित तक्रार देखील दाखल केली. आता पालिका प्रशासनाने त्यांना या सबंधित विषयावर नोटीस देखील दिली आहे, असं एका रहिवासी महिलेनं सांगितलं.

दोघी बहिणींना नोटीस

गेली ५ वर्षांपासून हे प्रकरण सुरु आहे. या मांजरामुळे काही तरी आजारी पसरू शकतात. यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेने फ्लॅटच्या मालक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना नोटीस बजावली आहे. तसेच पुणे एसपीसीएने ४८ तासांत फ्लॅटमधून मांजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??