डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्कूल कनेक्ट २.० उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सचिव विरसिंह रणसिंग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल कनेक्ट २.०’ उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.
शासनाच्या शिक्षणक्षेत्रात होत असलेल्या बदलांबरोबर रणसिंग महाविद्यालय बदलत असून सर्व स्तरातील तसेच गोरगरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची दालने सदैव खुली असतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचालक प्रतापसिंह कदम, ग्रामपंचायत वालचंदनगरचे माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड, वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सुरेश अर्जुन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, एन ई पी विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंगाडे व प्रमुख वक्ते प्रा. योगेश खरात उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी शैक्षणिक धोरणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रमुख वक्ते प्रा. योगेश खरात यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन, दहावी नंतरचे रोजगारक्षम अभ्यासक्रम, उपलब्ध संधी, पदवी अभ्यासक्रम , विद्यार्थ्याने उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठीचे मार्गदर्शन, विद्यापीठांच्या नव्या अभ्यासक्रम, नव्या पद्धतीचे मूल्यांकन, श्रेयांक पद्धती, शिष्यवृत्ती, इ. माहिती दिली.
उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभागाबद्दल माहिती देवून गीते सादर केली. या उपक्रमामध्ये वालचंद विद्यालय कळंब, माध्यमिक विद्यालय तावशी, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयातील २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी डॉ. विलास बुवा, प्रा. विनायक शिंदे, प्रा. राजलक्ष्मी रणसिंग, प्रा. काजल राजेभोसले, प्रा ज्योत्स्ना गायकवाड, डॉ. तेजश्री हुंबे इत्यादी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच इतर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन ई पी विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंगाडे, सूत्रसंचलन प्रा. राम मोरे व आभार प्रा. नितीन रुपनवर यांनी व्यक्त केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा