सामाजिक
‘शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्त्वाची‘ ; रिक्षा चालक सविता कुंभार..
मेरी राते, मेरी सडके कार्यक्रमात मांडले परखड मत..



यावेळी कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व जागर समितीचे संयोजक उपस्थित होते. यावेळी रुणाल मुल्ला म्हणाल्या, “समाजाला तोंड देत एखाद्या महिलेने नोकरी करत संसाराची जबाबदारी सांभाळत स्वाभिमानाने जगणं हे खूप आव्हानात्मक असतं हे आव्हान सांभाळण्यासाठी व्यक्तीचं मन खूप मजबूत असावे लागते.”
यावेळी ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रियंका रणपिसे, दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया, भटक्या विमुक्तांमध्ये काम करणाऱ्या शारदा खोमणे, निर्भय विद्यार्थी अभियानाच्या सुलभा क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते अकबर खान, इमाम शेख, अन्वर पठाण, डॅनिअल लांडगे, अजित गंगावणे, जार्ज स्वामी, उद्योजक गणेश बाबर यांनी सहकार्य केले. नीलिमा तारा सुरेश यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप कुऱ्हाडे यांनी आभार मानले.