
हडपसर (पुणे) : हडपसर ब्रिजखाली अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत. मात्र काल अचानक कारवाई करत पथारी व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसायिकांना हटविण्यात आले. या कारवाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ एका दिवसापुरता आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
कारवाईनंतर ब्रिजखालील परिसर जवळपास रिकामा झाल्याचे चित्र दिसले. फक्त पथारीवाल्यांना मात्र यातून सूट दिली गेल्याने इतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “नियम सर्वांसाठी समान असावेत. एखाद्या वर्गाला सूट आणि दुसऱ्याला दंड का?”
सध्या याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी काही व्यावसायिकांना तोंडी सांगण्यात आल्याचे समजते की, ही कारवाई तात्पुरती असून त्यांना पुन्हा परवानगी दिली जाईल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही.
यामुळे नागरिक व व्यावसायिक या दोघांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. “पथारीवाल्यांना परवानगी आणि इतरांना हटविणे यातून प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे?” असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
Editer sunil thorat




