हायकोर्टाने आझाद मैदानासाठी परवानगी नाकारली ; तरीही जरांगे पाटील ठाम…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा तापलं आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अर्जाला हायकोर्टाने नकार दिला आहे. मात्र, या निर्णयानंतरही जरांगे पाटील आझाद मैदानावरच आंदोलन करणार असल्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे लोक आहोत. आमचे वकील न्यायालयात जातील आणि आम्हाला नक्कीच परवानगी मिळेल. लोकशाही मार्गाने होणारं आंदोलन कोणीही रोखू शकत नाही. सरकारने गोरगरिबांच्या भावनांशी खेळू नये.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही 27 ऑगस्टला निघणार आहोत आणि 29 तारखेला आझाद मैदानावर पोहोचणार आहोत. आम्ही एकही नियम मोडणार नाही. सरकार कितीही अडचणी निर्माण करो, पण आंदोलन थांबणार नाही.”
दरम्यान, हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असलं तरी, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे.
Editer sunil thorat



