पूर्व हवेलीत वाहतूक शाखेकडून फॅन्सी नंबरची झाडाझडती..; सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीत कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे.
नुकतीच उरुळी कांचन पोलिसांनी बुलेटचा आवाज काढणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. बुलेट पोलीस ठाण्यात आणल्या असता पूर्व हवेलीतील गाडयांच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईची मागणी होत असल्याने पूर्व हवेलीतील अनेक गाडया फँन्सी नंबर प्लेट घेऊन रोडवर फिरत असल्याचे दिसून आले.
परंतु वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदा असताना त्याकडे वाहतूक पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती. त्या अनुषंगाने लवकरच गाडयांच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले होते.
तसेच हडपसर व लोणी काळभोर येथे वाहतूक पोलिसांनी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर वाहतूक शाखेने सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार व सर्व सहकाऱ्यांनी लोणी काळभोर हद्दीत बुलेटचा आवाज काढणे, फॅन्सी नंबर प्लेट, विरुद्ध दिशेने येणारे, ट्रिपल सीट यावर कारवाई सुरू केली असून दंड वसुलीचे काम चालू आहे. यावेळी पोलीस हवालदार आरती खलचे या महिला पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांवर स्थानिक नेत्यांचा दबाव….
वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर स्थानिक नेते पोलिसांना कारवाई न करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समजले. वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदा असुन आरटीओच्या नियमांनुसार ठराविक नमुन्यातीलच नंबर प्लेट वाहनावर असणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनचालक अनेकदा वाहनांवर नाना, दादा, भाऊ, आप्पा, किंग, ठाकूर, बादशहा आदी अक्षरे क्रमांकांच्यानुसार फँन्सी नंबर प्लेट तयार केल्याचे दिसून येते. अपघात झाला तर वाहनाचा क्रमांकही नागरिकांना व पोलिसांना व्यवस्थित दिसत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई कडक करण्यात आली आहे.



