
हडपसर (पुणे) : जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NPWA) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषक वितरण व सत्कार समारंभ शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश बुरांडे (संचालक, फार्मसी विभाग, जे.एस.पी.एम. विद्यापीठ) उपस्थित होते, तर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) चे सदस्य विजय पाटील हे सत्कारमूर्ती म्हणून लाभले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून PCI च्या सदस्यपदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल विजय पाटील यांचा जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व NPWA यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रो. जावळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी NPWA Inspire 2025 या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जे.एस.पी.एम. शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल प्र. आडकर होते. तसेच डॉ. सचिन कोतवाल, डॉ. अमोल शाह, प्रो. डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. नरहरी पाटील, प्रा. पोपट जाधव, डॉ. गौरीशंकर स्वामी, सागर पायगुडे, डॉ. रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी NPWA चे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी NPWA च्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करून फार्मसी क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले. NPWA चे सचिव डॉ. संपत नवले यांनी फार्मसी प्रोफेशनच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी NPWA सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी NPWA च्या कार्याचा आढावा घेत फार्मसी क्षेत्रातील सध्याच्या अडचणींवर सामूहिक प्रयत्नांतून तोडगा काढण्याचे आवाहन केले. सत्कारमूर्ती श्री. विजय पाटील यांनी NPWA व फार्मसी शिक्षण संस्थांना भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याच प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मॉडेल फार्मसी प्रात्यक्षिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष व्यावसायिक कामाचा अनुभव घेता येईल व त्याचा त्यांना मोठा फायदा होईल, असे प्राचार्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रविराज जाधव व प्रा. तनुजा काशिद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. संपत नवले यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसे, आकांक्षा जाधव आदींनी विशेष सहकार्य केले.
Editer sunil thorat








