दामीणी मार्शल महिला पोलीस शिल्पा हरीहर व महीला पोलीस अंमलदार सरीता जाधव तात्काळ घटना स्थळी दाखल ; इसमास ताब्यात घेतले..धक्कादायक घटना..

पुणे (हवेली) : कुंजीरवाडी ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयातील, अल्पवयीन मुलीला छेडछाड प्रकरणी अटक करण्यात आले.
ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, कुंजीरवाडी, च्या मुख्याध्यापक सावंत मॅडम यांनी फोनद्वारे घटनेची माहीती दामीणी मार्शल महिला पोलीस शिल्पा हरीहर व महीला पोलीस अंमलदार सरीता जाधव यांना दिली.
मुख्याध्यापक सावंत मॅडम यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला केला पत्र व्यवहार तो असा आमच्या विद्यलयामध्ये गुरुवार दिनांक २०/०३/२०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संदीप केरबा कुंजीर वय ४० वर्षे अंदाजे (कुंजीरवाडी, पोस्ट ऑफीसच्या मागे) याने विद्यालयामधील इ. ६ वी च्या विद्यार्थीनीची शाळेच्या आवारामध्ये येऊन तिचा हात पकडून आंगावर ओढले व ती पळून जाऊ नये म्हणून तीच्या पायावरती पाय देऊन उभा राहीला असता विद्यार्थीनीने आरडाओरडा केला व त्याचा हात झटकून पळून जाऊन विद्यार्थी हिने झालेला प्रकार विद्यालयाच्या मुख्याध्यापीका सावंत एस डी मॅडम यांना सांगीतला व त्या ठीकाणी मुख्याध्यापीका गेल्या असता सदर इसम पळून गेला होता.
त्या संदर्भात मुख्याध्यापीका सावंत यांनी महीला पोलीस अंमलदार शिल्पा हरीहर दामीणी मार्शल यांना फोनद्वारे सदर घटनेची माहीती दिली. त्या व त्यांच्या सोबत असणा-या महीला पोलीस अंमलदार सरीता जाधव तात्काळ विद्यालयामध्ये हजर झाल्या.
त्या व्यक्तीस त्याच्या राहत्या घरामधून तात्काळ ताब्यात घेतले. बीट मार्शल यांना बोलावून घेतले सदर व्यक्तीस पोलीस प्रशासनाकडून कडक समज देण्यात यावी ही नम्र विनंती.
असे एक निवेदन पत्राद्वारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला दामिनी मार्शल शिल्पा हरिहर व महिला पोलीस अंमलदार सरिता जाधव यांच्या मार्फत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे याच्याकडे पत्र व इसम पुढील कारवाईसाठी ताब्यात दिला.



