जिल्हासामाजिक

“वनपरिमंडळ लोणी काळभोर येथे बिबट्या हल्ल्यात मृत झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईचे वाटप शासन नियमानुसार लाभार्थ्यांना”

पुणे (हवेली) : वनपरीमंडळ लोणी काळभोर मधील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या‎ पशुधन नुकसान भरपाईपाेटी‎ पशुपालक लाभार्थी यांना शासन नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात आली.
बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या, गायी, कालवडी, वासरे‎ आदी जनावरांचा मृत्यू झाला हाेता.‎ वन विभागाने पंचनामे करुन‎ मदतीचा अहवाल वरिष्ठांना सादर‎ केला हाेता. यानुसार संबंधित‎ पशुधनपालकांना मदत मंजूर झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हाेती. लोणी काळभोर येथे प्रभु निवृत्ती रुपनवर (टिळेकरवाडी), मारुती लक्ष्मण ढवरे (वाडेबोल्हाई) रामदास शंकर श्रीराम (भुर्केगांव) लहु रामभाऊ बरकडे (तरडे) बबन नातु तोंडे (हिंगणगाव) व तुषार हरीचंद्र शिंदे (शिंदेवाडी) या पशुपालकांना एकुण १ लाख ८५‎ हजार मदतीचे धनादेश देण्यात आले.‎ शासनाकडून मदत मिळाल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पशुपालकांना दिलासा मिळाला‎ आहे.‎
यावेळी वन परिक्षेत्र‎ अधिकारी सुरेश वरक, वनपरीमंडळ अधिकारी लोणी काळभोर प्रमोद सकर, वनरक्षक लोणी काळभोर अंकुश कचरे, संभाजी गायकवाड (खामगांवटेक), कोमल सपकाळ (अष्टापुर), पुजा कुबल (डोगरगांव), प्रती नागले (आळंदी म्हातोबाची), ऋतुजा कचरे (थेऊर रोपवाटिका), बापु बाजारे वनसेवक वनपरीमंडळ लोणी काळभोर. तुळशीराम कोंढारे वनसेवक लोणी काळभोर आदी उपस्थित‎ हाेते.‎

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??