
संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हडपसरमधील ससाणे नगर येथील महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या वतीने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे १८ पगड जाती आणि सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन स्वराज्य उभारणारे थोर योद्धे होते. त्यांच्या कार्यपद्धतीत जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन केवळ कार्यक्षमतेला महत्त्व होते. हाच विचार समाजात रुजावा यासाठी कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव यावर भर देण्यात आला.
हा कार्यक्रम शिवसेना अल्पसंख्यांक विभाग पुणे शहरप्रमुख अश्फाक भाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये शिवसेना कामगार आघाडी जिल्हाप्रमुख संतोष रजपूत, मागासवर्गीय आघाडी शहरप्रमुख मनोज खुडे, इब्राहिम शेख, जनशक्ती विकास संघ अध्यक्ष आसिफ खान, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख राजू मुलाणी, युवासेना शहर प्रमुख राहुल काळे, सचिव गुरुनाथ सुतार, तालुका प्रमुख रोहन शिंदे, गणेश पवार, रईस पठाण, अजरुद्दीन सय्यद, आसिफ सलीम खान, वैद्यकीय कक्षप्रमुख अजय सपकाळ, संजय शिंदे, शाहिद तांबोळी, संजय भुजबळ, डॉ.शैलेश धुमाळ, डॉ. महेश मोरे, हाजी नाजीम शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना अश्फाक भाई मोमीन यांनी सांगितले की, “शिवाजी महाराज हे सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन चालणारे होते. आज काही राजकीय प्रवृत्ती समाजात तणाव पसरवत असल्या तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्यासाठी काम करत राहू.”




