जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात, मोठी दुर्घटना टळली ; पोलिसांचा सततचा पाठपुरावा व्यर्थ, NHAIचे काम अद्याप अपूर्ण!

महामार्गावर मृत्यूचा सापळा! १८ टायर ट्रकची डिव्हायडरवर जोरदार धडक ; सुरक्षाव्यवस्था ढासळली, पोलिसांची मागणी NHAIकडे धाडली तरी प्रतिसाद शून्य!

उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्ग (क्र. ६५) वर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता एक १८ टायर मालवाहतूक ट्रकने टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. याची माहिती ट्रक ड्रायव्हर अंकुश सानप यांना विचारली असता एक टॅम्पोला वाचविण्याच्या नादात अपघात झाला असे सांगितले. अपघात इतका भीषण होता की इतर वाहनांनाही त्यात नुकसान होण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठी हानी टळली.

या घटनेनंतर उरुळी कांचन पोलीस स्टेशनकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) विविध सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे

पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वारजे यांना सादर केलेल्या अहवालात पुढील सूचना केल्या आहेत –

मानकर यु-टर्न आणि कस्तुरी यु-टर्न येथे वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी ७ रंबलर पट्ट्यांचे प्रत्येकी ५ सेट बसवावेत.

मानकर, सैराट आणि कस्तुरी यु-टर्न येथे ब्लिंकिंग (फ्लॅशिंग) लाईट्स बसविण्याची आवश्यकता.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तळवडे चौक, पी.एम.टी. चौक आणि डाळींब चौक येथे झेब्रा क्रॉसिंग रेखाटाव्यात.

नव्या यु-टर्न ठिकाणी दिशादर्शक साईन बोर्ड आणि नाईट रिप्लेक्टर लाईट्स बसवाव्यात.

यु-टर्न तयार करताना फोडण्यात आलेले डिव्हायडर तातडीने दुरुस्त करावेत. असे 30/08/2025 ला केलेल्या पत्रव्यवहार मुद्दे आहेत.

परंतु पोलिसांच्या प्रतिक्रियेत ठेकेदारांचा कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुढे म्हणाले…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील (उरुळी कांचन पो.स्टे.) यांनी सांगितले, “एनएचएआय इंजिनिअर प्रशांत जगताप यांच्याकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी काम सुरू केले असले तरी ठेकेदारांकडून काम फारच मंद गतीने होत आहे. यापूर्वीही आम्ही पत्रव्यवहार, ई-मेल आणि फोनद्वारे त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

NHAIची बाजू : “काम पूर्ण झालेले आहे” दरम्यान, एनएचएआयचे इंजिनिअर प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. “मी स्टेटमेंट देऊ शकत नाही, पंकज सरांशी संपर्क साधावा. आजच्या घडीला सर्व काम पूर्ण झाले आहे. रबर प्रिन्स आणि सोलर फिल्टर मशीनचे ओपनिंग झाले आहे. तळवडे चौक व इलाईट चौकातील काही काम प्रलंबित असले तरी, पोलिसांनी नमूद केलेल्या उपाययोजनांची बहुतांश पूर्तता झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना लवकर राबविण्याची गरज जबाबदारी कोणाची? प्रश्न विचारायचा कोणाला?…

उरुळी कांचन परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुचवलेली उपाययोजना तातडीने राबविणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असून, NHAI व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??