जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

राज्य मराठी पत्रकार परिषदेची विभागीय आढावा बैठक पार ; संघटन विस्तार, महिला सक्षमीकरण, सदस्य नोंदणी यांवर ठोस दिशा…

कळंब (पुणे) : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश पुणे विभागीय आढावा बैठक सुंदराई हॉटेल, पुणे–नाशिक महामार्ग, कळंब येथे उत्साहात पार पडली. परिषदचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे आणि राज्य कार्यकारिणीचे (वरिष्ठ) सदस्य सुनिल थोरात यांच्या नेतृत्वामुळे बैठक कार्यक्षम, ठोस आणि दिशादर्शक ठरली. 

शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता बैठकीला प्रारंभ झाला. पुणे जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार तसेच महिला मंच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मधुसूदन कुलथे यांचे स्पष्ट मार्गदर्शन…

राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी संघटनेचा विस्तार महाराष्ट्राच्या पलीकडे चार राज्यांत सक्रियपणे सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी पुढील मुद्द्यांवर विशेष भर दिला :

—दिनदर्शिका प्रकाशन उपक्रमाचे महत्त्व
—पत्रकार सक्षमीकरणासाठी बँक–संघटनाची गरज
—-सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढविण्याची तातडी
—कार्यपद्धती, शिस्त व संघटन रचना अधिक मजबूत करण्यावर मार्गदर्शन
—तसेच पश्चिम महाराष्ट्र व इतर जिल्ह्यातील पत्रकार आणि महिला मंच नियुक्त्यांचे संपूर्ण अधिकार सुनिल थोरात यांच्याकडे आहेत असे जाहीरपणे सांगितले.

सुनिल थोरात यांनी महिला मंच बळकट करण्यावर भर…

राज्य कार्यकारणी (वरिष्ठ) सदस्य सुनिल थोरात यांनी महिला मंचाच्या उभारणीला महत्त्व दिले. त्यांच्या मार्गदर्शनातील मुख्य मुद्दे :

—सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा महिला मंचात समावेश.
—संघटन वाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन.
—पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार व महिला मंच नियुक्त्या प्रक्रियेवर सुरू असलेले काम.
—जिल्ह्यात संघटनाची पकड मजबूत करण्याचे लक्ष्य.

राज्य उपाध्यक्ष प्रविण शिंदे यांनी यावेळी… 

संघटनेत निष्क्रियपणे कार्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करत नारळ द्यावा अशा कडक शब्दात सुचना करत फक्त पद घेऊन मिरवणाऱ्या पदाधिकारी यांना घरी बसवा अशा वरिष्ठांना यावेळी सुचना केल्या.

मान्यवरांची ठळक उपस्थिती.

या महत्त्वपूर्ण बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, राज्य कार्यकारणी (वरिष्ठ) सदस्य सुनिल थोरात, राज्य उपाध्यक्ष प्रविण शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष शुभांगी वाघमारे, खेड तालुका अध्यक्ष डॉ. देवेंद्र वोव्हाळ, सुनिल वाकचौरे, सुधाकर अभंग, आंबेगाव तालुका सखी मंच कार्याध्यक्ष जयश्रीताई दहिदुळे, भारती हांडे, मयूर ढोबळे, नंदू बोराडे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पत्रकार व महिला सदस्य सलगपणे उपस्थित होते.

महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा…

बैठक विविध संघटनात्मक विषयांना दिशा देणारी ठरली. चर्चेत प्रमुखत्वाने संघटन विस्तार आणि नवी सदस्य नोंदणी, पत्रकारांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दे, महिला मंचाच्या आगामी उपक्रमांची आखणी, जिल्हास्तरीय कार्यपद्धती सुधारणा, संघटन विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन यांसंबंधी निर्णय या सर्व विषयांवर परिणामकारक चर्चा व निर्णय घेण्यात आले.

बैठकीचे प्रभावी सूत्रसंचालन…

संपूर्ण बैठकीचे कसून आणि प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सुधाकर अभंग यांनी केले. संवादात्मक वातावरणामुळे सर्व पदाधिकारी व सदस्यांना आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. ही पुणे विभागीय आढावा बैठक संघटनेच्या पुढील कार्ययोजनेस नवे बळ, स्पष्ट दिशा आणि अधिक एकजूट देणारी ठरली.

सत्कार करताना क्षणचित्रे…

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??