अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटणास सुरवात, विविध ठिकाणी छापे ;लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे..

तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्विकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. या धडक कारवाई मोहिमे दरम्यान वेगेवगेळ्या ठिकाणी अवैध धंद्यावर छापा टाकत लोणीकाळभोर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोहिमे दरम्यान हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर कारवाई करुन ८८ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांना दि. २१ जानेवारी रोजी ५:३० वाजताच्या सुमारास रामदरारोड, लोणी काळभोर पुणे येथे रेकॉर्डवरील महिला प्रमलता मुकेश कुमावत (वय ४५ वर्षे रा. मंतरवाडी, फुरसुंगी पुणे) ही गावठी हातमट्टी दारु तयार करून विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाली. त्यानुसार त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी, यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडून एकूण ८८ हजार ७०० रुपयांचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण जप्त करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत या मोहिमेदरम्यान १८ जानेवारी रोजी ८ वाजन्याच्या सुमारास काळुबाई मंदिराचे पाठीमागे, गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे येथे रेकॉर्डवरील महिला नामे संगिता तानाजी भाले (वय ५५ वर्ष रा. गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे) ही गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाल्याने त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशानुसार पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडुन एकुण ३ हजार २०० रुपयांची सुमारे ३२ लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
तिसऱ्या घटनेमध्ये अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिमेदरम्यान २२ जानेवारी रोजी ६:३० वाजण्याच्या सुमारास बोस्टन चहाच्या पाठीमागे, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे येथे रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक तात्यासाहेब महादेव ससाणे, (वय ५० वर्षे रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे) हा बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळत असल्याची बातमी लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. सदर बातमी प्राप्त होताच त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी स्वतः पोलीस उप निरीक्षक बोबडे, ग्रे. पोलीस उप निरीक्षक जगदाळे यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान आरोपी तात्यासाहेब सहाणे यांच्याकडून एकुण ३ हजार ३५० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
अवैध धंद्यावरील या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.



