
पुणे (हडपसर) : मांजरी व शेवाळवाडी परिसरामध्ये सोसायटींसाठी प्रथमच बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अमित अण्णा पवार युवा मंच व राजे क्लब यांच्या वतीने करण्यात आले होते. अत्यंत रोमहर्षक व रोमांचकारी सामने अस्पायर टर्फ ग्राऊंडवर पार पडले.
एकूण ३० संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात झुंबा वॉर्मअपने झाली. प्रत्येक संघामध्ये एक महिला खेळाडू घेणे अनिवार्य असल्याने सामन्यांमध्ये रंगत आली. पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचं उदघाटन संपन्न करण्यात आले. तसेच सिने अभिनेता निखिल चव्हाण व बिग बॉस फेम वैभव चव्हाण हे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते.
अटातटीच्या अंतिम सामन्यांमध्ये विजेतेपद कोहिनुर व्हिलेज सोसायटी (कर्णधार अथर्व चव्हाण) यांनी पटकाविले तर उप-विजेता संपन्न होम्स सोसायटी (कर्णधार प्रथमेश खिलारे) हि ठरली. स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार शुभम गाडेकर यांनी पटकाविला तर इमर्जिंग प्लेअर हा किताब हा श्रुती चव्हाण हिला मिळाला.
या कार्यक्रमासाठी महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा ममता शिवतारे-लांडे, मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच शिवराज घुले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख तुषार हंबीर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश कामठे, पंचायत समितीचे मा. सभापती अशोक अण्णा मोरे, संकेत टिळेकर, शिवसेना नेते सुभाष मेमाणे, मा उपसरपंच सुधीर घुले, छायाताई गदादे, सीमा शेंडे, तुषार कामठे, मनोज कामठे, हेमलता पडवळकर, दीपक ढोरे, प्रीतम गावडे, गणेश भापकर, रुकेश घुले, विनोद काळे, लेखन जगताप, गणेश क्षीरसागर, शिवसेना पदाधिकारी व राजे क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे समालोचन विशाल बावणे, सनी बिल्लाडे व महेश होले यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने आजूबाजूच्या सर्व सोसायटीतील सदस्यांना एकत्र खेळण्याची व आनंद साजरा करण्याची सुंदर संधी उपलब्ध झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र खेळताना दिसले. सामाजिक बांधिलकी व क्रीडा प्रेम जपण्यासाठी आमच्या वतीने केलेला हा छोटासा प्रयत्न यशस्वी होताना पाहून समाधान वाटत आहे असे शेवाळवाडीचे उपसरपंच व राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमित पवार म्हणाले.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



