लोणी काळभोर पोलिसांची कारवाई! चैन स्नॅचींग प्रकरणातील चोरटे अटकेत; ₹१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त….

पुणे (हवेली) : दिनांक २९/०६/२०२५ रोजी सायंकाळी १७/३० वा. चे सुमारास संगिता पंडीत बोडके वय ४८ वर्षे रा. बोडके वस्ती, काकडे मळा रोड, थेऊर ता. हवेली, जि. पुणे या बोडके वस्ती येथील निलेश किराणा स्टोअर्स नावाच्या किराणा मालाचे दुकानावर किराणा माल आणण्यासाठी गेले होते.
त्यावेळी किराणा माल खरेदी करीत असताना त्याठिकाणी काळया रंगाचे स्प्लेंडर दुचाकीवरुन दोन व्यक्ती आले व त्यांनी किराणा दुकानावर चिक्की खरेदी करण्याचा बहाणा करुन त्या महिलेच्या गळयातील १० ग्रॅम (१ तोळे) वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावुन, दुचाकीवरुन पळुन गेले होते.
या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दि. २९/०६/२०२५ रोजी दोन अज्ञात इसमांविरुध्द, गु. र. नं. २९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या झालेल्या दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी आरोपींचे सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तसेच त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे मदतीने कौशल्यपुर्णरित्या तपास करुन यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन त्यांची नावे निष्पन्न केले. त्या दोघांपैकी आरोपी नाव १) सचिन अर्जुन ढगे वय १९ वर्षे रा. कदम बंगल्याजवळ, माऊली नगर, कात्रज, पुणे यास दि. १४/०७/२०२५ रोजी १८/०५ वा. दाखल गुन्हयात लोणी काळभोर पोलीसांनी अटक केली दुसरा आरोपी नाव रोहित राजु माने वय २५ वर्षे रा. निंबाळकर वस्ती, दत्त मंदिराजवळ, कात्रज, पुणे यास दि. १५/०७/२०२५ रोजी ०९/०० वा. अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीकडे सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने सखोल तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांनी गुन्हयात चोरलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर गाडी पोलीसांनी ते पंचनाम्यात जप्त केली.
वास्तवीक पाहता सदर गुन्हा अज्ञात आरोपीतांविरुध्द दाखल असताना तसेच सदर आरोपीतांबाबत काही एक उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नसताना देखील लोणी काळभोर पोलीसांनी अविरत प्रयत्न करुन, असंख्य कॅमेरे पडताळुन आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे दृष्टीने प्रभावीरित्या व कौशल्यपुर्ण तपास केला व आरोपीतांची नावे निष्पन्न करुन, त्यांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. व आरोपींकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मंगळसुत्र देखील आरोपींकडुन हस्तगत केले.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. हवा. सातपुते, पो. हवा. वणवे, पो. हवा. भोसले, पो. हवा. माने, पो. हवा. जगदाळे, पो. हवा. देवीकर, पो. शि. कुंभार, पो. शि. गाडे, पो. शि. कर्डीले, पो. शि. सोनवणे, पो. शि. शिरगिरे, पो. शि. दडस, पो. शि. पाटील, पो. शि. कुदळे, पो. शि. विर, म.पो.शि. थोरात यांनी केली आहे.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



