IPL २०२५ : आजपासून रंगणार IPLचा रणसंग्राम! १० संघ, १३ शहरे अन् ७४ लढती; पाहा संपूर्ण वेळापत्रक…
असा रंगणार उद्घाटन सोहळा...

मुंबई : आजपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळला जाईल.
आज आयपीएलचा पहिला सामना सुरू होईल, तर अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाईल. जाणून घ्या आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक पहा.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. त्याआधी आयपीएल २०२५ चा धमाकेदार उद्घाटन सोहळा पार पडेल. या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची गर्दी पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसह गायिका श्रेया घोषाल आणि अरिजीत सिंगसारखे प्रसिद्ध चेहरे झळकणार आहेत. आयपीएलने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच आयपीएलच्या उद्घाटन समारंभाला आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
…१० संघ, क्रिकेट रणसंग्राम, ७४ सामने…
आयपीएल २०२५ मध्ये एकूण ७४ सामने खेळवले जातील. लीग टप्प्यात ७० सामने होतील. सर्व १० संघ लीग टप्प्यात प्रत्येकी १४ सामने खेळतील. आयपीएल २०२५ चे सर्व सामने एकूण १३ शहरांमध्ये खेळवले जातील. लखनौ, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, कोलकाता आणि धर्मशाळा याठिकाणी हे सामने होतील.
…आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक…
२२ मार्च – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२३ मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२३ मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स
२५ मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२६ मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२७ मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
२८ मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२९ मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
३० मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
३० मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
३१ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स
३ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
५ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
६ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
७ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
८ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
९ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१० एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१२ एप्रिल – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
१२ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
१३ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१३ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
१४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
१५ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१६ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१७ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१८ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज
१९ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१९ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
२० एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२० एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
२२ एप्रिल – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२३ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२७ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स
२७ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२८ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
२९ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
१ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
४ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
४ मे – पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
५ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
६ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
७ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
८ मे – पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
९ मे – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१० मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
११ मे – पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
११ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१४ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
१५ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१६ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
१७ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१८ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
१८ मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२० मे – क्वालिफायर 1
२१ मे – द एलिमिनेटर
२३ मे – क्लालिफायर 2
२५ मे – अंतिम सामना





