ग्रामपंचायतमध्ये महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन ; रेडा..

गणेश वाघ / रेडा
पुणे (इंदापूर) : मंगळवार (दि.२८) रोजी स.१० वा. रेडा ग्रामपंचायत कार्यालयात महिला सभा आयोजित केली होती. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महिला सभेच्या अजेंडापत्रातील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करताना महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट या विषयी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संघटीका सुनिता घनश्याम जवंजाळ यांनी उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले. स्त्री जन्माचे स्वागत जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत जन्मलेल्या ११ कन्यांसह आईंना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
हळदी कुंकू, तिळगूळ वाटप
यावेळी सरपंच सुनिता नानासो देवकर. ग्रामपंचायत सदस्या प्रभावती धर्मराज देवकर, सिता मारुती मोहिते व भाग्यश्री सचिन देवकर. यांनी उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगूळ वाटप व भेट वस्तू देऊन सन्मानित केले.
महिलांचे आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्र निरवांगी व उपकेंद्र रेडणी चे डॉ. मुंडफणे व परिचारिका श्रीमती देशमुख यांनी आज उपस्थित महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली. व काही महिलांची रक्तदाब, मधुमेह व हिमोग्लोबीन तपासणी करून योग्य ती औषधे देऊन मार्गदर्शन केले. तसेच निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशासेविकांनी उपस्थित महिलांना आभा आरोग्य कार्डची माहिती दिली व आजच पुर्ण दिवसभर थांबुन अनेक नागरिकांचे आँनलाइन आभा कार्ड तयार केले.
महिलांसाठी योगा
यावेळी योगशिक्षिका शितल काळे. (सणसर) यांनी महिलांना आपल्या उत्तम व निरोगी आरोग्यासाठी योगशास्त्राची माहिती देऊन प्राथमिक स्वरूपात योगा चे काही प्रकार उपस्थित महिलांकडून करुन घेतले. व महिलांनी योग्य प्रतिसाद दिल्यास गावात महिला योगा वर्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले. या महिला सभेस १४० पेक्षा जास्त महिलांच्या उपस्थितीमुळे अतिशय उत्साहात, आनंदात व शांततेत ही महिला सभा यशस्वीपणे पार पडली.
ग्रामसभा
मंगळवार (दि.२८) रोजी स. ११ वा. ३० मि. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी अजेंडापत्रातील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करुन सर्वानुमते योग्य ते ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी १५० पेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीमुळे अतिशय उत्साहात, आनंदात व शांततेत ही ग्रामसभा यशस्वीपणे पार पडली. या महिला सभेस व ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सर्व महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक ग्रा.पं. पदाधिकारी, महसूल विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांचे ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते. यावेळी
सरपंच सुनिता नानासो देवकर. उपसरपंच सचिन हरिश्चंद्र देवकर, ग्रामपंचायत सदस्य धनंजय मारुती गायकवाड, प्रभावती धर्मराज देवकर, सिता मारुती मोहिते, ग्रामविकास अधिकारी श्री.बी.के.रणवरे. ज्येष्ठ नागरिक मारुती तबाजी मोहिते. विकास सोसायटीचे संचालक नानासो, जालिंदर देवकर. सचिव तुकाराम हनुमंत सोनटक्के, माजी चेअरमन चंद्रशेखर गणपत देवकर. श्रीराम उद्योग समुहाच्या संचालिका भाग्यश्री सचिन देवकर. अंगणवाडी सेविका श्रीमती रजनी कोंडीबा काळे, अर्चना भाऊसो. देवकर, मदतनीस सुवर्णा शहाजी देवकर, अलका पंढरीनाथ देवकर. आशा सेविका शितल दामोदर मोहिते, सारिका सतीश बनसोडे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संघटीका सुनिता घनश्याम जवंजाळ, जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.जाधव, जि.प. प्रा.शाळा. काटीमळा मुख्याध्यापक डी.एम. कुचेकर. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग (बाबा)राजेंद्र मोहिते, सतिश ज्ञानदेव भापकर. डाटा आँपरेटर अश्विनी विकास घोगरे, रोजगार सहाय्यक बाबासो. शंकर पवार, पाणी पुरवठा कर्मचारी प्रदीप हनुमंत पडळकर, ग्रामपंचायत कर्मचारी व अनेक महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते.





