सामाजिक
वीर पुरुष लखूजी लोहार जीवन चरित्र संशोधन प्रकल्प ग्रुपची प्रथम ऑनलाईन मिटिंग संपन्न..

पिंपरी चिंचवड : समाज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर , पत्रकार, कला, क्रीडा, सामाजिक कार्य करणाऱ्या ६५ प्रज्ञावंत महिला -पुरूष सहभागी असलेल्य खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्र वीर पुरुष लखूजी लोहार जीवन चरित्र संशोधन प्रकल्प ग्रुपची ऑनलाईन मिटिंग मंगळवार दि ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८:३० या वेळेत संपन्न झाली.
सहभागी सर्व सदस्यांनी आपला विस्तृत परिचय आधीच दिला असल्याने प्रत्येक सदस्याने वीर पुरुष लखूजी लोहार यांच्या जीवनावर आधारित माहिती संकलित करण्यासाठी काय करावे याविषयी आपले विचार व्यक्त केले.
सर्वांच्या विचार मंथनातून लोहार समाजातील भीमा लोहार यांच्या सह सर्वच ऐतिहासिक महापुरुषांविषयी संशोधन, माहिती संकलन, प्रचार, प्रसार करणे, सर्व सदस्यांची प्रत्यक्ष मिटिंग, सदस्यांसाठी कार्यशाळा, माहितीसाठी संदर्भ ग्रंथ, इतिहास संशोधकांच्या भेटी, ऐतिहासिक संदर्भ असलेल्या ठिकाणांना भेटी, स्मारकासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवणे, वेगवेगळ्या समाज माध्यमातून माहिती मिळवणे अशा महत्त्वपूर्ण सूचना आल्या. आलेल्या सर्व सूचना/ माहितीच्या आधारे लवकरच कालबध्द कृती कार्यक्रम आखून लवकरात लवकर ध्येयापर्यंत पोहचता येईल असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला.
प्रा डॉ रामदास लाड यांनी मिटिंगचे सुत्रसंचलन केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक व समारोपण केले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



