महाराष्ट्रराजकीय

महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात किती जिल्ह्यात मंत्रिपदे?

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा उत्साहात पार पडला. तिन्ही पक्षांनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. कोणत्या विभागातील आणि जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांचे मंत्रि‍पदाची इच्छा पूर्ण झाली, जाणून घेऊयात.

         तिन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे कोणाला संधी दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती. तिन्ही पक्षांनी मोठी कसरत करत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.

– चंद्रशेखर बावनकुळे : नागपूर, विदर्भ

– राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र

– हसन मुश्रीफ : कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

– चंद्रकांत पाटील : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

– गिरीश महाजन : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

– गुलाबराव पाटील : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

– गणेश नाईक : नवी मुंबई (ठाणे), कोकण

– दादा भुसे : नाशिक, उत्तर महाराष्ट्र

– संजय राठोड : यवतमाळ, विदर्भ

– धनंजय मुंडे : बीड, मराठवाडा

– मंगलप्रभात लोढा : मुंबई, कोकण

– उदय सामंत : रत्नागिरी, कोकण

– जयकुमार रावल : धुळे, उत्तर महाराष्ट्र

– पंकजा मुंडे : बीड, मराठवाडा

– अतुल सावे : छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

– अशोक उईके : यवतमाळ, विदर्भ

– शंभूराज देसाई : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

– आशिष शेलार : मुंबई, कोकण

– दत्तात्रय भरणे : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

– आदिती तटकरे : रायगड, कोकण

– शिवेंद्रराजे भोसले : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

– माणिकराव कोकाटे : नाशिक, उत्तर महाराष्ट्र

– जयकुमार गोरे : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

– नरहरी झिरवळ : नाशिक, उत्तर महाराष्ट्र

– संजय सावकारे : जळगाव, उत्तर महाराष्ट्र

– संजय शिरसाट : छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा

– प्रताप सरनाईक : ठाणे, कोकण

– भरत गोगावले : रायगड, कोकण

– मकरंद पाटील : सातारा, पश्चिम महाराष्ट्र

– नितेश राणे : सिंधुदुर्ग, कोकण

– आकाश फुंडकर : बुलढाणा, विदर्भ

– बाबासाहेब पाटील : लातूर, मराठवाडा

– प्रकाश आबिटकर : कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र

– माधुरी मिसाळ : पुणे, पश्चिम महाराष्ट्र

– आशिष जायस्वाल : नागपूर, विदर्भ

– पंकज भोयर : वर्धा, विदर्भ

– मेघना बोर्डीकर : परभणी, मराठवाडा

– इंद्रनील नाईक : यवतमाळ, विदर्भ

– योगेश कदम : रत्नागिरी, कोकण

        कोणत्या विभागात किती मंत्री?

           पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मंत्रिपदे दिली गेली आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे मिळून एकूण ११ मंत्री दिली गेली आहेत.

विदर्भातील 8 मंत्री असून नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील ६ मंत्री असून, नाशिक, धुळे, जळगाव यासारख्या भागांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

मराठवाड्यातही ६ जणांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. यात बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांना झुकतं माप मिळालं आहे.

मुंबईसह कोकण विभागात ८ मंत्रि‍पदे आली आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देताना समतोल साधल्याचा दिसत आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??