पुणे (पिंपरी) : वाकड येथे पान दुकानामध्ये (टपरी) गांजा विक्री करणार्या पुनीत कुमार या पानटपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पुनीत कुमारकडून ५ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. इतक्या प्रमाणात गांजा पकडण्यात आल्याने पिंपरी सह पुण्यात खळबळ उडाली.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष्य ठेवले होते. पुनीत हा त्याच्या ‘साई श्री पान शॉप’ या दुकानातून गांजा विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पुनीत कुमारला तात्काळ अटक करण्यात आली.
अशा अवैध अमली पदार्थ विक्री होत असल्याने पुणे शहर व आसपासच्या परिसरात अशा प्रकारच्या कारवाई करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाने अशा बहुसंख्येने विक्री होत असलेल्या पान टपरीवर कडक कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालावा. अशी मागणी होत आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा