शिक्षण
साधना विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…

पुणे (हडपसर) : शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षात १६ जून रोजी सुरू झाली. शाळेत नवीन प्रवेश घेतलेले व जुने विद्यार्थीही उन्हाळी सुट्टीनंतर मोठ्या जोशात व आनंदात शाळेत येत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे शाळांतून मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शैक्षणिक वर्षाची सुरुवात व प्रवेशोत्सवा साठी पुणे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विभाग सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पद्मा दिंडे यांनी विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सनई-चौघडयांच्या मंगल स्वरात विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश केला. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या वतीने आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे, ग्रंथालय विभागप्रमुख प्रदीप बागल, सांस्कृतिक विभागप्रमुख सविता पाषाणकर, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतापराव गायकवाड यानी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले. तर आभार गणेश निचळे यांनी मानले.
मुख्य संपादक सुनिल थोरात




