महाराष्ट्र

जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव..

सुनिल थोरात (प्रतिनिधी) 

पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा जाहीर ई-लिलाव २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे; ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.
           ई-लिलाव सहभागी होण्याकरीता १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी. लिलावाचे अटी व नियम ९ डिसेंबर रोजी पासुन कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तसेच सदरची वाहने पाहण्याकरीता ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत. ‘वाहने जशी आहे तशी’ या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
           वाहनांची यादी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय पुणे शहर, हवेली, जून्नर, मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी स्वत:कडे राखुन ठेवले आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??