
कदमवाकवस्ती : पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना कडक कारवाईचे आदेश दिले असतानाच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र चित्र वेगळंच दिसत आहे. कदमवाकवस्तीतील लोणी स्टेशन परिसरात अवैध ताडी विक्री आणि गांजा व्यवहार सुरू असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांत झळकली होती. मात्र, त्या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या ५० ग्रॅम गांजा जप्त केल्याचा दावा केला गेला होता, परंतु एवढ्या किरकोळ प्रमाणावरच एवढी मोठी कारवाई दाखवली गेली का, हा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील अवैध धंदे पुन्हा डोकं वर काढत आहेत, आणि पोलिसांच्या निष्क्रीय भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, २६/१०/२०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास तीन पोलीस कर्मचारी-एक अधिकारी, एक पुरुष व एक महिला पोलीस कर्मचारी-वर्दीत अवैध ताडी विक्रीच्या ठिकाणी पोहोचले, मात्र कोणतीही कारवाई न करता काही क्षणातच हात हलवत परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व पोलीस वैयक्तिक गाड्यांवरून आले आणि परत गेले, यामुळे “ही अधिकृत कारवाई होती का?” हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो आता व्हायरल होत असून, त्यात दोन पोलीस कर्मचारी बुलेटवर तर महिला पोलीस स्कुटीवर येताना दिसत आहेत. मात्र, कारवाई न करताच परत गेल्याने “कंट्रोलचा कॉल होता का की काही वेगळं?” अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांनी जर खरंच कारवाई केली असती, तर या अवैध धंद्याला आळा बसला असता. उलट, अवैध धंद्यांवर पोलिसांचा धाकच कमी झाला आहे का? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
“महाराष्ट्रातील सर्वात मोठी ५० ग्रॅम गांजाच्या धडाकेबाज कारवाई करणाऱ्या धडाकेबाज अधिकाऱ्यांची सगळीकडेच रंगली चर्चा..?”
या प्रकरणाचा उलगडा होईल का, आणि पोलिसांच्या या “माघारीमागचं रहस्य” अखेर बाहेर येईल का, या ठिकाणी अवैध ताडी विक्री होती तर 50 ग्रॅम गांजाचा गुन्हा कसा दाखल झाला..? परंतु अवैध ताडी विक्रीच्या कारवाईच्या ठिकाणी पोलीस किती वाजता गेले संबंधित इसम यांना पोलीस स्टेशनला आणले किती तासाने की सेटलमेंटचा भोभाटा झाल्याने विषय दाबण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 50 ग्रॅम गांजा विक्रीची कारवाई करण्यात आली खरंच ते इसम गांजा विक्रेते होते का..? त्यांच्यावर यापूर्वी काही गांजा विक्रीचे गुन्हे आहेत का..? या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन कडक शिस्तीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या विषयाची गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करणार का…? या विषयाची स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे
Editer sunil thorat



