सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे (शिरुर) : तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हरिभाऊ गायकवाड (वय-५३) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्रातील फायनान्स कंपनी ग्राहकाला नाहक त्रास देत असतात. असे कितेक उदाहरण ताजे असताना तळेगाव ढमढेरे येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली.
फायनान्स कंपनीने कर्जासाठी हरिभाऊ गायकवाड यांच. राहत घर गहाण ठेवून घेतले. कर्ज मंजूर न करता सुरवातीचे हप्ते भरून घेतले. मात्र, कर्ज दिले नाही. कर्ज न देता फायनान्स कंपनीने अक्षरशा दमदाटीच्या जोरावर काही हफ्ते गुंडगिरी प्रमाणे हरिभाऊ गायकवाड यांच्या कडुन वसुल ही केले.
या प्रकरणी महिंद्रा फायनान्स कंपनीच्या दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज दिलीप पवार आणि महेंद्र पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींचे नाव आहेत. याबाबत शीतल गायकवाड (वय-४३) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असल्याने त्यांनी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीमध्ये सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फायनान्स कंपनीला (माॅरगेज) म्हणून घराचे कागदपत्र देत घराचे गहाणखत फायनान्स कंपनीच्या नावावर करून दिले. त्यानंतर कंपनीने त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून काही हप्तेदेखील भरण्यास सांगितले. परंतु कर्जाच्या रकमेचा चेक हरिभाऊ गायकवाड यांना दिला गेला नाही. त्यानंतर ते वेळोवेळी फायनान्स कंपनीत गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. हरिभाऊ गायकवाड यांना पुणे येथील कार्यालयात बोलावून घेऊन कर्ज देणार नाही आणि घराचे ही गहाणखत बदलणार नाही, अशी धमकीही दिली. यातूनच हरिभाऊ गायकवाड यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा