
लोणी काळभोर (ता. हवेली) : दिनांक २७ ऑक्टोबर २०२५, सोमवार रोजी लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात लोणी काळभोर पोलीस स्टेशनतर्फे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन पोलीस निरीक्षक स्मिता टील (गुन्हे विभाग, लोणी काळभोर पोलीस स्टेशन), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के (लोणी काळभोर पोलीस स्टेशन) आणि विर (सायबर विभाग) यांनी केले. त्यांनी उपस्थित नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियावरील धोके, फिशिंग, तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम बापू काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग केसकर, तसेच अमोल कोळपे (संचालक, विश्वास विकास सेवा सहकारी सोसायटी) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी प्रत्येकाने सजग राहावे, अशा सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या.
Editer sunil thorat





