क्राईम न्युज

कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा, डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ …

पुणे : कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळया मैदानात, गगन उन्नती सोसायटीसमोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे दिनांक २२/०६/२०१९ रोजी ००:३० ते ००:४५ वाजताच्या दरम्यान घडली आहे.

यातील आरोपी तपिश पुखराज चौधरी, वय २६ वर्षे, रा. गगन उन्नती सोसायटी, शॉप नं. १८, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा, पुणे मूळ रा. ३२ बी, न्यू पाली रोड, भगत की कोठी, जोधपूर, राजस्थान याने त्याचे मोबाईलवरुन सिद्धार्थ सिंग या नावाने सुनिल रघुनाथ शास्ती, वय ५२ वर्षे, रा. प्लॉट नं. ६३, घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे हे ड्रायव्हर असलेली ओला (ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.) कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-12-QG-8987 ही कार प्रवासी म्हणून बुक करुन त्या कारमध्ये बसून कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळया मैदानात, गगन उन्नती सोसायटीसमोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे जाऊन कापडी गमच्याच्या साहाय्याने सुनिल शास्त्री (मयत) यांचा गळा आवळून त्यांचा खून करुन त्यांचा मृतदेह तेथेच मैदानामध्ये टाकून देऊन सुनिल शास्त्री यांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार जबरी चोरी करुन घेऊन गेला व सदर कार बुक करण्यासाठी वापर केलेले सिमकार्ड व सुनिल शास्त्री (मयत) यांचा मोबाईल फोन फेकून पुरावा नष्ट केला. म्हणून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५६१/२०१९ भा.दं.वि. कलम ३०२,३९७,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                                      तपास

तपास संतोष शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक फरासखाना पोलीस ठाणे यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ११६०/२०१९ असा आहे.

                                     शिक्षा

वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

                                         कामगिरी

सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील मिलींद दातरंगे व प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी महेश जगताप, सपोफौ यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी सपोफौ महेश जगताप व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि संतोष शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??