१० सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई, डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५ यांची धडक कारवाई …

पुणे : शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ प्रमाणे एकुण १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.
तडीपार करण्यात आलेले नावे…
१) लोणी काळभोर आरोपीचे नाव फिरोज महंमद शेख, वय २९ वर्षे, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे (खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.)
२) लोणी काळभोर आरोपीचे नाव प्रसाद दत्तात्रय जेठीथोर, वय २० वर्षे, रा. माळीमळा, खेडकर यांचेकडे भाड्याने, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे सध्या लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे (बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे, मारहाण, दुखापत, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
३) लोणी काळभोर आरोपीचे नाव चंद्रशेखर उर्फ चंद्रकांत उर्फ पिल्या दाजी चोरमोले (चोरमले), वय २३ वर्षे, रा. गाडेकर योचंकडे भाड्याने, गायकवाड चाळ, माळी मळा, लोणी काळभोर, पुणे (बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकावणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दहशत निर्माण करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत.)
४) मुंढवा आरोपीचे नाव अजय दिपक जाधव, वय ३५ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे (बेकायदेशीर जमाव जमविणे, बलात्कार, मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ करणे यासारखे एकुण १० दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
५) मुंढवा आरोपीचे नाव हनुमंत उर्फ बापु दगडु सरोदे, वय ४८ वर्षे, रा. कॅनाल शेजारी, भिमनगर, मुंढवा, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे, मारहाण, धमकावणे यासारखे एकुण ०७ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
६) मुंढवा आरोपीचे नाव साहील राजु साठे, वय १९ वर्षे, रा. दरेकर यांचे खोलीत, जनसेवा बँकेसमोर, केशवनगर, मुंढवा, पुणे (खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, दरोडा तयारी, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण ०५ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
७) कोंढवा आरोपीचे नाव वसीम सलीम पटेल, वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नं. ९, पटेल क्लासिक, स.नं. ६२/४/१५, साईबाबा नगर, लेन नं. ९. कोंढवा खुर्द, पुणे मुळ रा. दांडेकर पुल, पुणे (जबरी चोरी, चोरी, विनयभंग, बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण ०८ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
८) कोंढवा आरोपीचे नाव वसीम उर्फ वस्सु शकील खान, वय २५ वर्षे, रा. भाग्योदयनगर, मक्का मंजिलजवळ, मुबारक मंजिल, कोंढवा, पुणे (खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, बेकायदेशीर अंमली पदार्थ अनाधिकाराने विक्रीकरीता जवळ बाळगणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
९) बिबवेवाडी आरोपीचे नाव ओंकार शिवानंद स्वामी, वय २३ वर्षे, रा. बी/४/१७, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे (गंभीर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.)
१०) हडपसर आरोपीचे नाव आदीराज मनोज कामठे, वय २१ वर्षे, रा. भागीरथी नगर, साडेसतरानळी रोड, हडपसर, पुणे (जबरी चोरी, मारहाण, धमकावणे, दुखापत करणे, बेकादेशीर हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.)
सर्व तडीपार आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
सन २०२५ मध्ये परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पर्यंत ०९ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ३ मोका कारवाईमध्ये २१ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो ११ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ५१ सराईत गुन्हेगारांवर मागील १०० दिवसांत ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.
वरील प्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन केले आहे.



