जिल्हाशिक्षणसामाजिक

प्रतिभा, उत्साह आणि तरुणाईचा उत्सव ; ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू-व्हाईब्स २०२५’ उत्साहात संपन्न…

लोणी काळभोर (पुणे) : माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव ‘यू-व्हाईब्स २०२५’ अत्यंत जल्लोषात पार पडला. एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी, तळेगाव, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगली आणि चिचोंडी या नऊ कॅम्पसमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सर्जनशीलतेचा अफलातून मेळ घालत दोन दिवस कॉलेज परिसर रंगतदार केला.

महोत्सवाचा शुभारंभ जेष्ठ लेखक, कवी व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे आणि एमआयटी एडीटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. अश्विनी पेठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संचालिका डॉ. ज्योती जोतवानी, तसेच विविध कॅम्पसचे प्राचार्य उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना नामुगडे म्हणाले, “‘यू-व्हाईब्स’ सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव मजबूत होते. कला आणि कल्पकतेचा संगम तरुणांना अधिक सक्षम आणि सर्वांगीण घडवतो.”

दोन दिवस चाललेल्या महोत्सवात चित्रकला, रांगोळी, मेहंदी, फेस पेंटिंग, ग्रुप डान्स, गायन, टॅलेंट-शो अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा पूर्ण आत्मविश्वासाने सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

दुसऱ्या दिवशी क्रीडा स्पर्धांची सुरुवात एमआयटी एडीटी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांच्या हस्ते झाली. कबड्डी, धावणे, क्रिकेट, लांब उडी, पोहणे, बुद्धिबळ, गोळाफेक, थाळी फेक अशा क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेत स्पर्धा रंगतदार केल्या. यानंतर झालेल्या ‘बिझनेस बडीज’ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना प्रभावी सादरीकरणासह मांडत उत्तम व्यावसायिक क्षमतांचा प्रत्यय दिला.

यू-व्हाईब्स’ हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून सर्जनशीलता, मैत्री आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा मंच आहे, असे मत व्यक्त करत संचालिका डॉ. ज्योती जोतवानी म्हणाल्या, “वेगवेगळ्या कॅम्पसचे विद्यार्थी एकत्र येतात, अनुभवांची देवाणघेवाण करतात आणि नवीन नाती तयार होतात, हीच ‘यू-व्हाईब्स’ची खरी ताकद आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या रिपल शर्मा आणि योगेश नागपाल यांनी सर्वांचे आभार मानत महोत्सवाची सांगता केली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??