आरोग्यजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सह्याद्री हॉस्पिटल प्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश, हिवाळी अधिवेशनात मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवेदनशील भेट…

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणाची सविस्तर व गंभीर माहिती मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आली.

पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कै. केरू सकपाल यांच्यावर उपचार सुरू असताना गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा आरोप असून, उपचार प्रक्रियेत वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन झाले होते का, रुग्णाला वेळेत योग्य व आवश्यक उपचार देण्यात आले होते का, तसेच संपूर्ण प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका काय होती, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात सदर प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची ठोस मागणी केली. रुग्णाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती (Independent Medical Board) नेमावी, तसेच दोषी आढळणाऱ्या डॉक्टर, संबंधित कर्मचारी व हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राज्यातील आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, जबाबदार व रुग्णाभिमुख राहाव्यात, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील, असा विश्वासही मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला.

या भेटीमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त होत असून, आरोग्यविषयक गंभीर प्रश्नांवर राज्य शासन संवेदनशीलतेने आणि ठामपणे कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??