नागपूर विधानभवनात पुणे महानगर नियोजन समितीची निर्णायक बैठक ; मुख्यमंत्री फडणवीसांचे कडक निर्देश… नियोजन समीती सदस्य स्वप्नील उंद्रे…

नागपूर : दि. 11 डिसेंबर 2025, वेळ दुपारी 12.30 वा., विधान भवन, नागपूर येथे पुणे महानगर नियोजन समिती (MPC) ची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भूषविले. पुणे महानगराच्या सर्वांगीण, शाश्वत व नियोजित विकासासाठी या बैठकीत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय व ठोस निर्देश देण्यात आले.
पुणे महानगरासाठी स्ट्रक्चरल प्लानला गती…
पुणे महानगराची वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण व शहरीकरण लक्षात घेता कालमर्यादेत स्ट्रक्चरल प्लान (Structure Plan) तयार करण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हा आराखडा पुण्याच्या भविष्यातील शाश्वत विकासाचा कणा ठरेल, असे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
एकाच प्राधिकरणाकडे महानगर विकास…
महानगरातील वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे (PMRDA, MSRDC इ.) विभागलेली जबाबदारी न देता संपूर्ण पुणे महानगर क्षेत्राचा विकास एकाच Special Planning Authority (SPA) मार्फत करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत झाला.
TPS योजना वेळेत पूर्ण करण्याचे आदेश…
‘माण–म्हाळुंगे’ नगररचना योजना (TPS) गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे महानगरातील एकूण 15 एकीकृत Town Planning Scheme सुरू असून, त्यांना ठोस कालमर्यादा निश्चित करून विलंब न करता पूर्ण करावे, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
CMP – वाहतूक नियोजनाचा मास्टर प्लान…
पुणे शहर व महानगरासाठी Comprehensive Mobility Plan (CMP) तयार करून वाहतूक व दळणवळण सुलभ करण्याचा निर्णय झाला. प्रादेशिक, राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्ग विकसित करून पुण्याला आधुनिक, कार्यक्षम व लोककेंद्रित शहरांचा बेंचमार्क बनवण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला.
पुणे ग्रोथ हब संकल्पना…
पुणे महानगर क्षेत्राचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यासाठी ‘Pune Growth Hub’ ही संकल्पना विकसित होत आहे. हा आराखडा खाजगी संस्थांऐवजी राज्य निती आयोगाच्या ‘मित्रा’ संस्थेमार्फत तयार करण्याबाबत पडताळणी करून अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.
PMC मध्ये समाविष्ट 23 गावांचे नियोजन….
दि. 30 जून 2021 रोजी पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास नियोजन व विकास आराखडा पुढील काळात PMC मार्फतच पाहिला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
₹32,523 कोटींच्या 220 प्रकल्पांना मंजुरी…
पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांसाठी तब्बल ₹32,523 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, रस्ते विकासासह शहर आराखडे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
MPC ची भूमिका अधिक सक्रिय…
पुढील काळात पुणे महानगराचा समग्र विकास MPC सदस्यांशी सल्लामसलत करूनच केला जाईल. तसेच भूमिपूजन वा लोकार्पणाची वाट न पाहता नियोजन समिती सदस्यांना सोबत घेऊन थेट विकासकामे लोकसेवेत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे महानगरात सुरू असलेली विकासकामे
✅ 589 किमी लांबीच्या रस्त्यांची 127 कामे सुरू
✅ 83 किमी लांबीचा शहरांतर्गत वर्तुळाकार रस्ता
✅ औद्योगिक क्षेत्र, विकास केंद्रे व विमानतळ जोडणी रस्ते
✅ पूल व उड्डाणपुलांची 3 कामे
✅ गृहनिर्माण 3, पाणीपुरवठा 4 योजना सुरू
✅ वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण
लवकरच सुरू होणारी कामे…
✅ पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नद्यांचे पुनरुज्जीवन – 3 कामे
✅ चौकांतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 17 कामे
✅ 10 पर्यटन विकास केंद्रे
✅ 1 स्कायवॉक, मल्टी-मॉडल हबची 5 कामे
येरवडा–कात्रज भुयारी मार्ग…
येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किमी लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित असून, त्याची फिजिबिलिटी स्टडी सुरू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ₹7,500 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार, महानगर नियोजन समिती सदस्य स्वप्नील उंद्रे सहित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Editer sunil thorat





