गंगानगर, फुरसुंगी येथून शिक्षक बेपत्ता; पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन…

फुरसुंगी (पुणे) : दि. 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 13:30 वाजण्याच्या सुमारास इसम नाव शहादेव काशिनाथ उदमले (वय 40 वर्षे, धंदा शिक्षक) हे रमनलाल शहा माध्यमिक प्रज्ञा विद्यालय, लेन नंबर 04, गंगानगर, फुरसुंगी, पुणे येथून बाहेर पडले असून ते अद्यापपर्यंत घरी किंवा नातेवाईकांकडे परतलेले नाहीत.
या घटनेबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस यंत्रणेकडून शोधमोहीम सुरू आहे. सदर इसमाबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की, “बेपत्ता इसमाचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे.”
संपर्कासाठी :
फुरसुंगी पोलीस स्टेशन – ☎️ 020 / 29982175
Editer sunil thorat



