
हडपसर (पुणे) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच स्मितसेवा फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त, आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर सातववाडी (प्रभाग क्र. १६) येथे भव्य जनसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून मोठ्या संख्येने गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व बेरोजगार युवक-युवतींना प्रत्यक्ष लाभ मिळाला.
या भव्य मेळाव्यात रोजगार मेळावा, मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप, आधार कार्ड शिबीर, आयुष्मान भारत कार्ड शिबीर, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना शिबीर, उत्पन्न दाखला शिबीर तसेच उद्योजकता मेळावा अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून अनेक नागरिकांचे शासकीय कागदपत्रांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात आले तसेच आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम हडपसर सातववाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ आणि आरोग्य तपासणीची सुविधा एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास राजा माने (संपादक, माध्यमतज्ञ व राजकीय विश्लेषक), नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक उज्वलाताई जंगले, पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, गणेश घुले, महेंद्र बनकर, बालाजी राऊत, नलिनी मोरे, विजय मोरे, नितीन होले, उद्योजक तुषार गायकवाड, नमो मोर्चा अध्यक्ष अजय वीरकर, आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंडी, आरपीआय महिला आघाडी अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे, कमलेश आबा कापरे, नितीन आरु, संतोष कोद्रे, आप्पा हिंगणे, गुरुनाथ हडदरे, पोपट वाडकर, अविनाश काळे, प्रमोद डांगमाळी, संजय शिंदे, राहुल काळे, अजय नवले, निनाद टेमगिरे, बाळासाहेब केमकर, बाबुराव वाघमारे, हरिभाऊ सावंत, जोशी काका, सुनील शेवाळे, बाबू बागवान व त्यांचे सहकारी, गणेश डांगमाळी, काशिनाथ भुजबळ, परशुराम घनवट, विजय कोठावळे, अनंता रासकर, गोरक्ष जगताप, सुखदेव कांबळे, रवींद्र चव्हाण, अशोक सोरगावी, वाघमारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पल्लवी केदारी, रेखा आबनावे, छायाताई गदादे, इंद्रायणी नवले, शीतल शिंदे, सुशीला गुंजाळ, विजया भोसले, संगीता पाटील, सविता वाघमोडे, आशा भूमकर, वैशाली पाटील, लता सोनवणे, त्रिशाला वर्मा, मंगल अडवल, विमल वागलगावे, अंजली शहा, अश्विनी कुंभार, रुबिना शेख, लक्ष्मी पाचंगे, वर्षा इनामदार, छायाताई भिसे, राधिका बेळगेकर, भावना कांबळे, मंगल रायकर, करुणा भिसे, अर्चना भोसले, माधुरी देशमुख, हेमा गावडे, अश्विनी बिडवे, शीला भास्कर कट्टी, सविता ताकवले, कविता पाटील यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष म्हस्के, फरहान शेख, रवींद्र गायकवाड, गायत्री क्षत्रिय, दिपक दहिगूदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“जनतेचा विश्वास आणि सहभाग हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन स्मिता तुषार गायकवाड यांनी यावेळी केले.
Editer sunil thorat



