राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला!, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल ; आजपासून आचारसंहिता लागू… वाचा सविस्तर…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक वळण देणाऱ्या 29 महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेसोबतच आजपासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की, आचारसंहिता लागू असली तरी आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन व डिझास्टरशी संबंधित कामांवर कोणताही अडथळा राहणार नाही. प्रशासनाने या बाबतीत आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
निवडणूक कार्यक्रम (महत्त्वाच्या तारखा)…
👉🏻उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत: 2 जानेवारी 2026
👉🏻निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी 2026
👉🏻मतदानाचा दिनांक: 15 जानेवारी 2026
👉🏻मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026
मतदान संपण्याच्या 48 तास आधी प्रचारावर पूर्ण निर्बंध राहणार आहेत. यामध्ये सभा, मिरवणुका, ध्वनीवर्धक वापर आदींवर बंदी राहील.
महानगरपालिका व जागांचा तपशील…
👉🏻एकूण महानगरपालिका: 29
👉🏻एकूण जागा: 2,869
आरक्षणनिहाय जागा…
महिला: 1,442
अनुसूचित जाती: 341
अनुसूचित जमाती: 77
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): 759
या आरक्षणामुळे निवडणुकीत महिला व मागास घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येणार आहे.
1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय…
या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम मानण्यात आली आहे. मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह लावण्यात येणार आहे.
👉 अशा मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा असेल.
👉 संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
👉 गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष पथके नेमण्यात येणार आहेत.
प्रशासन सज्ज – मोठी यंत्रणा तैनात…
निवडणूक पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
👉🏻निवडणूक निर्णय अधिकारी: 200 पेक्षा अधिक
👉🏻सहायक निवडणूक निर्णय अधिकारी: 700 पेक्षा जास्त
👉🏻एकूण कर्मचारी: सुमारे 1 लाख 96 हजार
सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि पारदर्शक मतदानासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
प्रभाग रचना : मुंबई वेगळी, उर्वरित 28 बहुसदस्यीय…
राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रभाग रचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC):
👉🏻एक सदस्यीय प्रभाग
👉🏻मतदाराला फक्त 1 मत द्यावे लागेल
उर्वरित 28 महानगरपालिका:
👉🏻बहुसदस्यीय प्रभाग
👉🏻बहुतांश ठिकाणी एका प्रभागातून 4 सदस्य
👉🏻काही प्रभागांत 3 किंवा 5 सदस्य
👉🏻त्यामुळे मतदारांना एका प्रभागात 3 ते 5 मते द्यावी लागणार आहेत
राजकीय वातावरण तापणार…
या निवडणुकांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीसह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, शहरी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाहीत, तर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ‘सेमीफायनल’ म्हणून पाहिल्या जातात, त्यामुळे या निवडणुकांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
Editer sunil thorat



