
संतोष काकडे
पांगारे (पुरंदर) : दि. २१पांगारे ता. पुरंदर येथील श्री निष्णाई देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने देवस्थानच्या वतीने शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर नवीन विश्वस्त निवडीचा कार्यक्रम देवस्थान ट्रस्टच्या सचिवांनी जाहीर केला.
जाहीर कार्यक्रमानुसार दि. ६ जानेवारी २०२६ रोजी नवीन विश्वस्तांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टवर कार्य करण्यासाठी पांगारे गावातील अनेक नागरिक इच्छुक असल्याचे यावेळी दिसून आले. त्यासंदर्भात ट्रस्टच्या वतीने सविस्तर खुलासा करण्यात आला आहे.
निवड / नेमणूक : श्री निष्णाई देवस्थान ट्रस्ट (रजि.), पांगारे
कालावधी : सन २०२६–२०२७ ते २०३१–२०३२
एकूण विश्वस्तांची संख्या : किमान २५, कमाल ३१
निवड पद्धत : शक्यतो सामंजस्याने बिनविरोध निवड; अन्यथा सभेमध्ये उपस्थित सर्व सदस्यांच्या मतदानाने निवडणूक पद्धतीने निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरावेत. दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्राप्त झालेल्या एकूण अर्जांची व उमेदवारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मुदतीनंतर आलेले तसेच विहित नमुन्यात नसलेले अर्ज बाद करण्यात येतील व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
अर्ज भरण्याची मुदत :
सुरुवात – दि. २५ डिसेंबर २०२५
अंतिम दिनांक – दि. ५ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
नोंदणी फी : रुपये १,०००/- (एक हजार रुपये फक्त)
इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडून ट्रस्टचे सचिव यांच्याकडे अर्ज जमा करून त्याची पोच घ्यावी, असे आवाहन श्री निष्णाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Editer sunil thorat





