पोलीसांच्या अहोरात्र मेहनतीमुळे फुरसुंगी–ऊरळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत व यशस्वी… वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे…

फुरसुंगी (हडपसर) : पोलीस प्रशासनाच्या काटेकोर नियोजन, कडक बंदोबस्त आणि अहोरात्र मेहनतीमुळे फुरसुंगी–ऊरळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत व यशस्वीरित्या पार पडली.
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी प्रथम दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान निश्चित करण्यात आले होते. मात्र मा. न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया रद्द होऊन मतदान दि. २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आले.
फुरसुंगी–ऊरळी देवाची नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर तसेच फुरसुंगी पोलीस ठाणे दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी नव्याने सुरू झाल्यानंतर ही पहिलीच नगरपरिषद निवडणूक असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
या पार्श्वभूमीवर अमितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बंदोबस्ताचा सखोल आराखडा तयार करण्यात आला. त्यात रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग), संदीप भाजीभाकरे (पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा), डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उप आयुक्त, परि–५), राजलक्ष्मी शिवणकर, डॉ. सागर कवडे (पोलीस उप आयुक्त) तसेच श्रीमती अनुराधा उदमले (सहा पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग) यांचा समावेश होता.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ०१ अपर पोलीस आयुक्त, ०२ पोलीस उप आयुक्त, ०२ सहा पोलीस आयुक्त, ०४ पोलीस निरीक्षक, ४३ सहा पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, ३५० पोलीस अंमलदार, १०० होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे ०१ स्ट्रायकिंग फोर्स, ०१ आरसीपी, ०२ मल्टी सर्व्हेलन्स व्हॅन, मोटार परिवहन विभागाची ०६ मोठी वाहने व ०२ दुचाकी असा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अनुराधा उदमले, सहा पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग तसेच अतुलकुमार नवगिरे व अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस ठाणे) आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनांनुसार सर्व अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून कार्यरत होते.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, दंगल, तणाव किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले. या प्रशंसनीय कामगिरीमुळे फुरसुंगी–ऊरळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही शिस्तबद्ध, सुरक्षित व आदर्श पद्धतीने पार पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया फुरसुंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.
Editer sunil thorat



