जिल्हाराजकीयसामाजिक

“नगरसेवक होणार” म्हणणारे अनेक ; मात्र नागरिकांचा ठाम विश्वास धिवार कुटुंबावरच….

केशवनगर ते शेवाळवाडी, महादेव नगर ते मांजरी, साडे सतरा नवे ते साठे वस्ती, अन्सारी फाटा – सर्व परिसरात दिवार कुटुंबाची भक्कम पकड...

मांजरी बु! (हडपसर) : निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांकडून दावे, पत्ते आणि कागदोपत्री निवाऱ्यांची चर्चा सुरू असताना, कु. प्राची पितांबर धिवार यांचा निवारा हा केवळ पत्त्यावर मर्यादित नसून तो जनतेच्या विश्वासात आहे, अशी ठाम भावना प्रभाग क्र. १५ मध्ये नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मांजरी, केशवनगर, शेवाळेवाडी आणि साडेसतरा या संपूर्ण परिसरात कु. प्राची पितांबर धिवार यांचे नाव अपरिचित नाही. जन्म, शिक्षण, नातेसंबंध, समाजकार्य आणि सततची उपस्थिती – या सर्वांमुळे या परिसराशी त्यांचे नाते कायदेशीरही आहे आणि भावनिकही आहे.

घराघरात पोहोचलेला विश्वास…

केशवनगरमध्ये कौटुंबिक नाते, शेवाळेवाडी व साडेसतरा येथे नातलग व सामाजिक संबंध, तर मांजरी परिसरात सातत्याने समाजकार्य करत निवारा म्हणजेच नागरिकांचा विश्वास त्यांनी मिळवला आहे. त्यामुळे “निवारा कुठे?” हा प्रश्न जनतेला विचारण्याची गरज उरलेली नाही; कारण तो प्रत्येक घरात पोहोचलेला आहे.

संस्कार, अनुभव आणि सामाजिक बांधिलकी…

कै. जिजाबा रघुनाथ धिवार यांचे संस्कार, आई हिराबाई जिजाबा धिवार यांची सामाजिक शिकवण आणि मोठ्या कुटुंबातून आलेली समाजाशी जोडलेली जीवनशैली यामुळे कु. प्राची धिवार यांची ओळख केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर समाजात वावरणारी, प्रश्न समजून घेणारी नेतृत्व क्षमता म्हणून निर्माण झाली आहे.

प्रभाग क्र. १५ शी थेट बांधिलकी…

प्रभाग क्र. १५ अंतर्गत येणाऱ्या मांजरी–केशवनगर–शेवाळेवाडी–साडेसतरा या सर्व भागांमध्ये कु. प्राची पितांबर धिवार यांचा वावर सातत्याने राहिला आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, महिलांचे प्रश्न, नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी – या प्रत्येक बाबतीत प्रत्यक्ष सहभाग आणि मदत हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

कागदावरचा नव्हे, तर वास्तवातला विश्वास…

निवडणूक जवळ येत असताना “निवारा” या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी कु. प्राची पितांबर धिवार यांचा निवारा हा कागदावर सिद्ध करण्याची गरज नाही, कारण तो वर्षानुवर्षे नागरिकांच्या अनुभवात आहे, असे स्थानिक नागरिक ठामपणे सांगत आहेत.

जनतेचा प्रश्न स्पष्ट – ओळखीचा की ओळख करून देणारा?

आज प्रभाग क्र. १५ मधील जनता हा प्रश्न स्वतःलाच विचारत आहे – आपल्यात राहून प्रश्न सोडवणारा उमेदवार हवा, की केवळ निवडणुकीपुरता दिसणारा? या प्रश्नाचे उत्तर कु. प्राची पितांबर धिवार यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसा निवारा, नाते आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर जनमत अधिक ठाम होत असून, प्रभाग क्र. १५ मध्ये कु. प्राची पितांबर धिवार यांचे स्थान अधिक मजबूत होत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??