क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्र

कदमवाकवस्ती येथे नामांकित हाॅटेल मध्ये देहव्यापाराचा भांडाफोड!…

हायवेवरील ‘जयश्री एक्झिक्युटिव्ह’चा काळा धंदा उघड; मॅनेजर-वेटरसह २ अटकेत, २ पीडित महिलांची सुटका...

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे–सोलापूर महामार्गालगत कवडीपाट टोलनाका परिसरातील नामांकित हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट, बार अँड लॉजिंग येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत मोठा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत हॉटेलचा मॅनेजर व वेटर अशा दोन जणांना अटक करण्यात आली असून देहव्यापारासाठी वापरल्या जात असलेल्या दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे–सोलापूर हायवेवरील हॉटेल्समधील काळ्या धंद्यांचे भयावह वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.

दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गोपनीय खबऱ्यामार्फत हॉटेल जयश्री येथे देहव्यापार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता छापा कारवाईचे नियोजन करत एक बनावट ग्राहक पंचांसह हॉटेलमध्ये पाठवला.

रूम भाडे, कंडोम आणि ‘सर्व्हिस’… सगळा काळा व्यवहार उघड…

बनावट ग्राहकाने हॉटेलमधील मॅनेजर मोहन कसनु राठोड (वय ५०) याच्याकडे महिलांची ‘सर्व्हिस’ मागितली असता, त्याने पंचांसमक्ष होकार देत रूम भाडे १५०० रुपये असल्याचे सांगून रूम नं. २०१ मध्ये पाठवले. यावेळी आरोपी वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय २५) याने १०० रुपये घेऊन कंडोमचे पाकिट पुरवून देहव्यापाराला थेट मदत केल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मॅनेजर राठोड याने एका पीडित महिलेला रूम नं. २०१ मध्ये पाठवले. संबंधित महिलेने शारीरिक संबंधासाठी ५ हजार रुपये शुल्क असल्याचे सांगत व्यवहार निश्चित केला. ही खातरजमा होताच ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने पोलिसांना संकेत दिला आणि क्षणात रेडिंग पार्टीने रूमवर छापा टाकत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

देहव्यापार सिद्ध; ८४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

छापा कारवाईदरम्यान मॅनेजरवेटर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पीडित महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे ठोस पुराव्यांसह सिद्ध झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन व कंडोम पाकिटांसह एकूण ८४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु यामध्ये हाॅटेल मालकाचा किती सहभाग आहे हे समजले नसून तपास चालू आहे

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांचे रेस्क्यू करून पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

“तपासात संशयास्पद बाबी आढळल्यास आणखी गुन्हे दाखल” – राजेंद्र पन्हाळे

या कारवाईनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सदर प्रकरणाचा तपास अधिक सखोलपणे सुरू आहे. तपासादरम्यान आणखी संशयास्पद बाबी आढळल्यास या प्रकरणात अजून गुन्हे दाखल करण्यात येतील. लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व बाबींची कसून चौकशी केली जाईल.”

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई…

ही धडक कारवाई मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०६) डॉ. सागर कवडे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि बाबर, पो.हवा माने, सागर जगदाळे, महिला पो.शि. वनिता यादव, पो.शि. सोनवणे, कुंभार, मल्हार ढमढेरे आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर…

या घटनेनंतर पुणे–सोलापूर महामार्गावरील हॉटेल्स, लॉजिंग व रेस्टोबार्सवर पोलिसांची करडी नजर राहणार असून अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??