पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आज माझा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सन्मान संपन्न झाला.
या महाविद्यालयात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आमदार चेतन तुपे यांचे नेहमी महाविद्यालयात जाणे येणे होत असते. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांशी स्नेहाचे संबंध निर्माण झाले असल्याने हा सन्मान म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुकच थाप आहे. असे यावेळी चेतन तुपे यांनी सांगितले.

माझ्या माणसांनी मला दुसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करत राहणार आहे. आपल्या भागातील शिक्षण संस्थांच्या अडचणी सोडवून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यावर भर दिला देण्यासाठी मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही हीच भूमिका घेऊन पुढे जाईन असे यावेळी बोलताना सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आमदार चेतन तुपे पाटील यांचे महाविद्यालयास नेहमी सहकार्य लाभत असते. महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शनही लाभत असते. असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, रोहिणी तुपे, वंदना काळभोर, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. नाना झगडे यांच्यासह आदी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या सन्मानाने भारावून गेलो आहे. सर्वांचे या प्रेम व विश्वासासाठी मनापासून धन्यवाद! आमदार चेतन तुपे…
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा